स्थानिक

बारामती तालुक्यात अडीच लाखाहून अधिक जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

पावसाळ्यात संसर्गजन्य रोगाची साथ येण्याची शक्यता

बारामती तालुक्यात अडीच लाखाहून अधिक जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

पावसाळ्यात संसर्गजन्य रोगाची साथ येण्याची शक्यता

बारामती वार्तापत्र

तालुक्यात ३ लाख १४ हजार ७२४ पशुधनांपैकी विविध आजाराला प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने २ लाख ६० हजार ६४४ इतक्या जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण पूर्ण करण्यात आले असून उर्वरित जनावरांचे लसीकरण करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. धनंजय पोळ यांनी दिली आहे.

तालुक्यात (गाय आणि म्हैसवर्ग) एकूण १ लाख ३३ हजार ८३३ मोठी जनावरांपैकी घटसर्प आजाराकरीता २३ हजार १९५, फऱ्या ३ हजार ८२९, लाळखुरकुत १ लाख २५ हजार ५२, लंम्पी ७९ हजार ४३४ इतक्या जनावरांना तसेच एकूण १ लाख ८० हजार ८४१ शेळ्या व मेंढ्या असून त्यापैकी आंत्रविषार या आजाराकरीता २९ हजार १३४ जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे.

पावसाळ्यात संसर्गजन्य रोगाची साथ येण्याची शक्यता लक्षात घेता नजिकच्या दवाखान्यात आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, पावसाळ्यात आपले जनावरे आजारी पडल्यास शासकीय दवाखान्यात त्वरित संपर्क करुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार करून घ्यावेत, गोठ्यातील स्वच्छता, निवारा यांचे योग्य नियोजन करावे, संबंधित ग्रामपंचायतीकडून परिसरामध्ये किटकनाशक फवारणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. पोळ यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button