बारामती येथे माळी समाज वधु वर सूचक मेळावा
दिनांक रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 09 ते 04या वेळेत

बारामती येथे माळी समाज वधु वर सूचक मेळावा
दिनांक रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 09 ते 04या वेळेत
बारामती वार्तापत्र
विवाह संस्कार हा हिंदू धर्मातील एक प्रमुख संस्कार मानला जातो यामध्ये उपवर वधू वरांच्या उज्वल भविष्यासाठी दोन परिवारातील कुटुंबाच्या जडणघडणीसाठी सामाजिक स्तरावर दोन कुटुंबांची ओळख होणे फार गरजेचे व हिताचे असते यातूनच माळी समाजाचा जिल्हास्तरीय वधू-वर परिचय मेळावा महात्मा फुले मंगल कार्यालय पाटस रोड बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी सामाजिक जाण व बांधिलकी असणारे जपणारे सन्माननीय श्री राजाभाऊ चिंचकर (चिंचवड) व सन्माननीय श्री विजय भगवान हिरवे (वडगाव निंबाळकर) व समाजातील सर्व बांधव व भगिनी यांच्या प्रयत्नातून, दिनांक रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 09 ते 04या वेळेत आयोजित केलेला आहे.
तरी सर्व समाज बांधवा , व इच्छुक वधू-वर यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन श्री ज्ञानेश्वर कौले बाप्पू व श्री रोहिदास हिरवे यांनी केले.