बारामती येथे २४ व २५ जून रोजी प्रशासकीय चषक स्पर्धेचे आयोजन
थकवा व ताण नाहीसा करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन
बारामती येथे २४ व २५ जून रोजी प्रशासकीय चषक स्पर्धेचे आयोजन
थकवा व ताण नाहीसा करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन
बारामती वार्तापत्र
बारामती येथे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी प्रशासकीय चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी दिली आहे.
दिनांक २४ व २५ जून रोजी सकाळी ९ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती येथे क्रिकेट स्पर्धा व जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत.
मागील गेल्या दोन वर्षांत विविध शासकीय आस्थापनेतील अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना संसर्गाच्या उपाय योजना करण्यासाठी सेवा दिलेल्या आहेत. त्यांची शारीरिक व मानसिक क्षमता सक्षम बनवण्यासाठी, आरोग्याच्या दृष्टीकोनातून, थकवा व ताण नाहीसा करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन महत्त्वाचे ठरणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना फिरता चषक प्रदान करण्यात येणार आहे. सर्व शासकीय विभागांनी क्रिकेट व व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता गणवेशानुसार संघ तयार करून तशी माहिती जिल्हा क्रीडा संकुल समिती, बारामती यांना तात्काळ कळविण्यात यावी, असे आवाहन तालुका क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.