पोदार स्कूलमध्ये बालदिनी विद्यार्थ्यांचा जल्लोष
विविध मनोरंजनात्मक खेळांतून विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद

पोदार स्कूलमध्ये बालदिनी विद्यार्थ्यांचा जल्लोष
विविध मनोरंजनात्मक खेळांतून विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद
बारामती वार्तापत्र
दि. १४ नोव्हें.बारामती येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दररोजचा परिपाठ घेतला. संगीत शिक्षक संकेत बर्गे यांनी गीत गायनातून मुलांचे मनोरंजन केले.
विद्यार्थ्यांनी क्रीडांगणावर विविध गीतांवर नृत्य , समूहगीत सादर केले.आयोजित केलेल्या विविध मनोरंजनात्मक खेळांतून विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला.
सहशिक्षक आलिया शेख यांनी बालदिनाची माहिती दिली.
शाळेचे प्राचार्य तुषार कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमासाठी समन्वयक माधुरी क्षीरसागर , तुषार चव्हाण , मंगेश महामुनी , सोनाली काळे , प्रशासकीय अधिकारी शेखर तुपे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख बालाजी घोळवे यांनी केले.