महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त इंदापूर सायकल क्लबचा इंदापूर ते फुलेवाडा प्रवास
फुले दाम्पत्यांना केले अभिवादन
महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त इंदापूर सायकल क्लबचा इंदापूर ते फुलेवाडा प्रवास
फुले दाम्पत्यांना केले अभिवादन
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज दि.२८ रोजी इंदापूर सायकल क्लब ने इंदापूर ते पुणे (फुलेवाडा) असा दीडशे किलोमीटर चा प्रवास करून फुले दाम्पत्यांना अभिवादन केले.
या प्रवासात भिगवण सायकल क्लबचे अर्जुन तोडकर, महाराष्ट्र टाईम्सचे तालुका प्रतिनिधी नितिन चितळकर,डॉ.काशिनाथ सोलनकर इत्यादीनी स्वागत केले.या प्रवासात कोरोना व सायकल वापर जनजागृती करण्यात आली.फुले वाडा येथे फुले दाम्पत्यांना अभिवादन करून जयघोषाच्या घोषणा दिल्या.यावेळी इंडो अॅथलेटिक्स सोसायटी चे अध्यक्ष गजेंद्र खैरे यांनी इंदापूर सायकल क्लबच्या या उपक्रमाबद्दल स्मृतिचिन्ह व मेडल देऊन सन्मानित केले.
या सायकल रॅलीमध्ये इंदापूर सायकल क्लबचे संस्थापक अध्यक्ष सुनिल मोहिते, दशरथ भोंग,प्रशांत शिताप,रमेश शिंदे,अमित बधे,अस्लम शेख, उमेश राऊत,ज्ञानदेव डोंगरे,सुनिल बारवकर इत्यादी सदस्य सहभागी होते.