वडगाव मावळ पोलीस स्टेशन मधील अनोळखी मयताच्या खुनाच्या गुन्ह्यातील मयताची ओळख पटवून खुनाचा गुन्ह्यातील आरोपीस अटक
मयताची कोठेही मिसिंग खबर नसताना

वडगाव मावळ पोलीस स्टेशन मधील अनोळखी मयताच्या खुनाच्या गुन्ह्यातील मयताची ओळख पटवून खुनाचा गुन्ह्यातील आरोपीस अटक
मयताची कोठेही मिसिंग खबर नसताना
क्राईम ; बारामती वार्तापत्र
वडगाव मावळ पोलीस स्टेशन गु.र.नंबर-०२/२०२१ भा.द.वि.क- ३०२ मधील घटनास्थळ मौजे आर्डव ता.मावळ जि पुणे गावचे हद्दीत पवना नदीचे पात्रातील पाण्यामध्ये ता.०१/०१/२०२१ रोजी सकाळी एक २५ ते ३० वर्षे वयाचे पुरुष जातीचे मयत मिळून आले होते व सदर प्रकरणी कलम 302 भा द वि प्रमाणे गुन्हा नोंद होता.
प्रस्तुत अनोळखी मयताची ओळख पटविणेसाठी आम्ही मा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण, पुणे शहर, पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांना तपास याद्या पाठवून, मयताचे फोटोना सर्वप्रकारे प्रसिद्धी देऊन तसेच स्थानिक पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न करणेत आलेले होते.परंतु मयता बाबत कोठेही मिसिंग किंवा माहिती आढळून आली नाही खडक पोलीस स्टेशन पुणे शहर येथील मिसिंग मधील एक बेपत्ता इसम मयताच्या वर्णनाशी मिळता जुळता होता, त्यामुळे त्याचे नातेवाईकांचे रक्त नमुने घेऊन DNA तपासणी साठी पाठविणेत आलेले होते परंतु DNA अहवाल नकारात्मक आला त्यामुळे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी मा पोलीस अधीक्षक मा.डॉ अभिनव देशमुख सो,मा विवेक पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सो , मा.नवनीत कावंत सहा पोलीस अधीक्षक सो लोणावळा विभाग यांचे मार्गदर्शना खाली पुन्हा जोमाने तपास चालू केला. पो.नि निंबाळकर व त्यांच्या पथकाने
▪️पुणे शहर व पिंपरी चिंचवड मधील एकूण ४८ पोलीस स्टेशन मध्ये खास अंमलदार नेमून आम्ही पुन्हा एकदा तपासयाद्या व मयताचे फोटो पाठवून प्रत्येक पोलीस ठाण्यात आम्ही मयताचे फोटो लावले होते.
ता.०२/०६/२०२१ रोजी गुलटेकडी मार्केट यार्ड पोलीस स्टेशन मध्ये आम्ही लावलेला मयताचा फोटो विजय शहाजी चव्हाण नावाचे चहा विक्रेत्याने मयताचा फोटो पाहून तो किशोर दिनकर लोंढे असल्याचे व सध्या दीड वर्षा पासून थेरगाव, काळेवाडी मध्ये आपल्या बहिणीकडे राहत असल्याची माहिती इकडील पोलीस स्टेशन ला दिल्यावर इकडील एक पथक पाठवून मयताच्या बहिणीचा पत्ता निष्पन्न करून त्यांना मयताचे फोटो व चीजवस्तू दाखविल्या असता त्यांनी मयताच्या अंगठ्या, ताईत, व पॅन्ट ओळखले तसेच मयतास गांजा ओढण्याची व दारू पिण्याची सवय असल्याची माहिती देऊन, मयत व्यक्तीस घरातून न सांगता ३ ते ४ महिने कोठेही जायची सवय असल्याने त्यांनी किशोर च्या मिसिंग बाबत कोठेही खबर दिली नसल्याची माहिती दिली.
मयत किशोर दिनकर लोंढे यास गांजा व दारू पिण्याची सवय असल्याने आम्ही त्याची नेहमी बसण्या उठण्याची ठिकाणे व गांजा ओढणारे मित्रांची नावे निष्पन्न करून थेरगाव काळेवाडी परिसरातील गांजा ओढणारे मुलांकडे चौकशी केली परंतु काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही, दरम्यान मयताचा मोबाईल क्रमांक निष्पन्न करून आम्ही त्याचा CDR प्राप्त करून विश्लेषण केले असता मयताचे व एका संशयित मोबाईल फोनचे सतत संपर्क झाला असल्याचे दिसून आलेवर आम्ही तो नंबर कोणाचा आहे याचा तपास केला असता तो नंबर संगीता सांतराम दुबे रा.थेरगाव काळेवाडी पुणे या नावावर असल्याचे दिसून आले त्याप्रमाणे त्या पत्त्यावर सदरच्या महिलेचा शोध घेतला असता सदरच्या पत्त्यावर ती महिला मिळून आली नाही, त्यामुळे संशयित मोबाईल फोन वरून संपर्क झालेल्या एका फोनची माहिती घेतली असता तो फोन पुणे शहरातील वडारवाडी परिसरातील जेल मधून सुटलेल्या एका गुन्हेगाराचा फोन असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही त्याच्याकडे जाऊन त्याचा फोन तपासला असता त्याचे फोन मध्ये संशयित मोबाईल फोन आरिफ या नावाने सेव्ह असल्याचे तसेच मयताचा नंबर आरिफ2 असा सेव्ह असल्याचे दिसून आल्यावर त्याच्याकडे सदरचा इसम कोण आहे याबाबत माहिती विचारली असता त्याने या नंबर वरून त्याचा जेल मध्ये ओळख झालेला मित्र आरिफ सिद्धीक शेख रा.थेरगाव काळेवाडी याचा असल्याचे व फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यास वाकड पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती दिल्याने, आम्ही वाकड पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आरोपी आरिफ शेख बाबत माहिती घेतली असता, त्याच्यावर माहे फेब्रुवारी २०२१ मध्ये भा.द.वि.क- ३५४, ४३५ चा गुन्हा दाखल असून त्याची प्रियसी गायत्री महादेव आडागळे हिने दिलेल्या फिर्यादी वरून त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन, खामगाव जि बुलढाणा येथे गु.र.नंबर-२१/२०२१ IPC ३७६ वगैरे गुन्हा दाखल असून आरोपीचा बुलढाणा पोलिसांनी ताबा घेऊन गेले असल्याची माहिती मिळाली असता आम्ही तेथील अधिकाऱ्यांना फोन द्वारे संपर्क केला असता तेथील तापसिक अधिकारी श्री जगदाळे स.पो.नि यांनी आरोपी आरिफ शेख याने कास्टडी मध्ये असताना बोलता बोलता मी व माझ्या मित्रांनी पुण्यात एक खून केला आहे असे बोलला आल्याची माहिती दिली होती परंतु तेथील अधिकाऱ्यांनी खात्री करणेसाठी वाकड पोलीस स्टेशन ला खुनाचा कोणता गुन्हा दाखल आहे का अशी माहिती विचारली परंतु वाकड हद्दीत खुनाच्या गुन्ह्यातील कोणतेही प्रेत मिळालेले नसल्याने त्यांनी आरोपीने सांगितलेल्या माहिती कडे दुर्लक्ष केले होते परंतु प्रस्तुत गुन्ह्यातील सर्व परिस्थिती पाहता गुन्हा आरिफ सिद्धीकी शेख यानेच केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपी आरिफ सिद्धीकी शेख वय-२५ वर्षे रा.थेरगाव, काळेवाडी, पुणे यांस गुन्ह्याचे कामी अटक करणेत आलेली असून, उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
प्रस्तुत गुन्ह्यातील मयताची ओळख पटविणेसाठी व आरोपी निष्पन्न करणेसाठी पो.नि श्री सुरेश निंबाळकर, पो.उप निरी श्री संतोष चामे, पो.हवा/५५ काळे, पो.हवा/९१३ कंटोळी, पो.ना/४०० कसबेकर, पो.ना/१८५४ तावरे, पो.ना/१९ कदम, पो.कॉ/२११३ तावरे, पो.कॉ/२९०१ ननावरे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे गुन्ह्यातील मयत किशोर दिनकर लोंढे वय-२५ वर्षे यास घरामध्ये कोणासही काही एक न सांगता कामासाठी दोन ते तीन महिने बाहेर जायची सवय आल्याने मयताच्या नातेवाईकांनी तो नेहमी प्रमाणे कोठे तरी कामासाठी गेला असावा असे समजून त्याची मिसिंग खबर दिलेली नव्हती त्यामुळे मयताची ओळख पटविणेस आव्हान होते असे असताना मयताची कोठेही मिसिंग खबर नसताना सुद्धा वडगाव पोलिसांनी अतिशय कौशल्याने मयत व्यक्तीची ओळख पटवून सुमारे ६ महिन्याने गुन्हा उघडकीस आणला आहे