महागाई विरोधात बारामतीत बहुजन मुक्ति पार्टी युवा व महिला आघाडी तर्फे आंदोलन
टॅक्सी, रिक्षा, मोटारसायकल, सायकल धक्का मारो आंदोलन

महागाई विरोधात बारामतीत बहुजन मुक्ति पार्टी युवा व महिला आघाडी तर्फे आंदोलन
टॅक्सी, रिक्षा, मोटारसायकल, सायकल धक्का मारो आंदोलन
बारामती वार्तापत्र
बारामती तहसिल कचेरी ता:-१५/०६/२०२१ वार:- मंगळवार रोजी. सकाळी ११: वा.बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व महिला आघाडी तर्फे टॅक्सी, रिक्षा, मोटारसायकल, सायकल धक्का मारो आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल,गॅस,तेल महागाई व वाढत्या वीज बिलाच्या विरोधात व केंद्र सरकार राज्य सरकारच्या धोरणांविरोधात बारामती बहुजन मुक्ती पार्टीचे युवा व महिला आघाडी वतीने आज (दि.१५) रोजी बारामती तहसील आंदोलन करण्यात आले.
१) पेट्रोल, डिझेल, गॅसच्या भरमसाठ वाढलेल्या किमती कमी करा.
२) खाद्यतेल तसेच जीवनावश्यक वस्तू खाद्य पदार्थांचे भाव कमी करा.
३) वीज बिल माफ करा.
४) महागाई कमी करता येत नसेल तर खुर्ची खाली करा.
दरम्यान पेट्रोल-डिझेल गॅसच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती कमी करा,खाद्यतेल तसेच जीवनावश्यक खाद्य पदार्थांचे भाव कमी करा,वीज बिल माफ करा,महागाई कमी करता येत नसेल तर खुर्ची खाली करा अशा विविध मागण्यांच्या संदर्भातील निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
या आंदोलनाला भारत मुक्ती मोर्चा बारामती तालुका युनिट व मुलनिवासी महिला संघ बारामती तालुका युनिट तर्फे पाठिंबा दिला.
यावेळी मा.उषा थोरात मॅडम, पुणे जिल्हा प्रभारी, मा. बबलू शेलार सर बहुजन मुक्ती पार्टी बारामती तालुका प्रभारी, अनिता शेलार मॅडम भारत मुक्ती मोर्चा बारामती तालुका अध्यक्ष, दिपाली लोंढे मॅडम मुलनिवासी महिला संघ बारामती तालुका उपाध्यक्ष, ज्योती गायकवाड मॅडम मुलनिवासी महिला संघ बारामती तालुका अध्यक्ष उपस्थित होते.