बारामतीतील टेक्निकलच्या श्री सुधीर जाधव सर यांचा स्वेच्छा निवृत्ती कार्यक्रम संपन्न
सुधीर जाधव सर यांनी विद्यालयाला कलर प्रिंटर भेट

बारामतीतील टेक्निकलच्या श्री सुधीर जाधव सर यांचा स्वेच्छा निवृत्ती कार्यक्रम संपन्न
सुधीर जाधव सर यांनी विद्यालयाला कलर प्रिंटर भेट
बारामती वार्तापत्र
बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयातील किमान कौशल्य या व्यावसायिक अभ्यासक्रमाला अध्यापन करणाऱ्या पूर्ण वेळ शिक्षक म्हणून कार्यरत असणारे श्री सुधीर मोहन जाधव यांचा शुभेच्छा निवृत्तीचा कार्यक्रम नुकताच विद्यालयात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री सदाशिव (बापू ) सातव होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून रयतचे माध्यमिक विभागाचे सहसचिव श्री बंडू पवार तसेच माजी सहाय्यक विभागीय अधिकारी अशोकराव जगदाळे, श्री गणपतराव तावरे,
मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य श्री सुभाषराव लकडे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री भगवान भिसे यांनी केले. श्री सुधीर जाधव हे 22 सप्टेंबर 1993 रोजी रयत शिक्षण संस्थेच्या या विद्यालयात नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरी या शाखेत त्यांनी नोकरीस सुरुवात केली.
त्यानंतर मॉडर्न कॉलेज वाशी, साधना विद्यालय ,हडपसर आणि टेक्निकल विद्यालय बारामती अशा शाखांमध्ये काम करत आज 32 वर्ष आणि 4 महिन्यानंतर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे.
त्यांचे अनेक विद्यार्थी स्वतःच्या पायावरती विविध व्यवसायांमध्ये व्यावसायिक म्हणून उभे आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमातून बिल्डिंग व्यावसायिक म्हणून उदयास आले आहेत.
सदर कार्यक्रमासाठी अनेक रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यालयामार्फत सरांचा सत्कार करण्यात आला. तसेच रयत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने त्यांना चांदीचे नाणे भेट म्हणून देण्यात आले.
सुधीर जाधव सर यांनी विद्यालयाला कलर प्रिंटर भेट म्हणून दिला.कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सतीश पाचपुते यांनी केले तर सूत्रसंचालन श्री विकास जाधव सर यांनी केले.






