शैक्षणिक

बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ड्रोन कार्यशाळाचे यशस्वी आयोजन

एकूण ५१ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ड्रोन कार्यशाळाचे यशस्वी आयोजन

एकूण ५१ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

बारामती वार्तापत्र

विद्या प्रतिष्ठानच्या *शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स* यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय व ५ दिवसीय ड्रोन कार्यशाळांचा समारोप उत्साहात संपन्न झाला. दि. ४ मे ते ६ मे २०२६ या कालावधीत ३ दिवसीय तर दि. ४ मे ते ८ मे २०२६ या कालावधीत ५ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या दोन्ही कार्यशाळांमध्ये पुणे, नाशिक आणि बारामती परिसरातील एकूण ५१ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
उद्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांना परिचित करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या.

या कार्यशाळेची संकल्पना व प्रेरणा प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांनी दिली. तसेच ड्रोन लॅब इन्चार्ज डॉ. राजवीर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. श्रीकांत महाडिक यांनी प्रभावी नियोजन व समन्वयाची जबाबदारी पार पाडली.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती, डीजीसीए नियम व नियमावली, फिक्स्ड विंग व रोटरक्राफ्ट प्रणाली, ड्रोन असेंब्ली, व्हर्च्युअल लॅब प्रशिक्षण, सिम्युलेशन तसेच प्रत्यक्ष ड्रोन फ्लायिंगचे प्रशिक्षण देण्यात आले.

सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी रिमोट पायलट प्रमाणित प्रशिक्षक डॉ. हाफिज शेख, श्री. मंदार मोरे, श्री. मयूर गावडे, सौ. रुपाली झारगड, श्री. चिन्मय गायकवाड यांनी मोलाचे योगदान दिले.

विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमधून ड्रोन असेंब्ली, सिम्युलेशन व प्रत्यक्ष ड्रोन उड्डाण याबाबत उपयुक्त तांत्रिक कौशल्य आत्मसात केले. भविष्यातील ड्रोन, रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील करिअरच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली तसेच भविष्यात ड्रोन संदर्भातील विविध कार्यशाळामध्ये सहभागी होण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्य सुधीर लांडे, प्रा. परशुराम चित्रगार, प्रा. राजवीर शास्त्री आणि कार्यशाळेतील सर्व प्रशिक्षक यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्रक देण्यात आले. ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विद्या प्रतिष्ठान संस्थेचे व्यवस्थापन मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले.

Back to top button