पुस्तक वाचण्याची चळवळ सुरू करण्याची गरज !;लेखक – संजय सोनवणे
ही जत्रा 9 10 व 11 मे या तीन दिवसाकरिता असून वाचक प्रेमींनी याचा लाभ घ्यावा

पुस्तक वाचण्याची चळवळ सुरू करण्याची गरज !;लेखक – संजय सोनवणे
ही जत्रा 9 10 व 11 मे या तीन दिवसाकरिता असून वाचक प्रेमींनी याचा लाभ घ्यावा
बारामती वार्तापत्र
सोशल मीडिया आणि मोबाईलमध्ये जखडलेला माणूस आज पुस्तकं वाचायला विसरला आहे या जोखंडातून बाहेर काढण्यासाठी गावोगावी पुस्तकांची जत्रा यांचे आयोजन करून पुस्तक वाचनाची चळवळ सुरू करण्याची गरज असल्याचे मत सुप्रसिद्ध लेखक संजय सोनवणे यांनी व्यक्त केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुस्तकांची जत्रा सोहळ्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक संजय सोनवणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माळेगांव सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन शेंडे, वनिता बनकर, मंगल बोरावके, लेखक डॉ संजय जगताप, अध्यक्ष प्रा. रवींद्र टकले, प्रा. नलिनी कोकाटे, कवी सदानंद करंदीकर, उपाध्यक्ष बापूसाहेब लोखंडे, वळकुंदे, सुर्यकांत भालेराव सर, रवींद्र बनकर, शंकरराव भुजबळ आदी मान्यवर उपस्थिती होते.
सर्वसामान्यांना पुस्तकाच्या वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून पुस्तकांची जत्रा अशोक नगर मधील स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित केली आहे. ही जत्रा 9 10 व 11 मे या तीन दिवसाकरिता असून वाचक प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रारंभी बारामती नगरीचे नगराध्यक्ष सचिन शेठ सातव यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या नलीनी ताई कोकाटे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यामध्ये अनेक प्रकारची पुस्तके प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत तसेच सदर पुस्तके सवलतीच्या दरात पुस्तके मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. सदर पुस्तकांची जत्रा तीन तीन दिवसांपर्यंत असल्याने याचा लाभ बारामतीकरांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहनही आयोयोजकांनी केले आहे.
याप्रसंगी नितीन शेंडे नीलिमा कोकाटे लेखक डॉ. संजय जगताप यांनी पुस्तक वाचन ही काळाची गरज असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
या पुस्तकांची जत्राचे प्रस्ताविक प्रा. रवींद्र टकले यांनी केले तर कवी कवी सदानंद करंदीकर यांनी मनोगत व्यक्त केले, सूत्रसंचालन कवी अनिल रूपनवर यांनी तर स्वागत बापू लोखंडे यांनी केले व आभार नवनाथ वळकुंडे यांनी मानले.






