अथर्व पवारांच्या यशाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून कौतुक; असिस्टंट कमांडंटपदी निवडीबद्दल अभिनंदन
बारामतीच्या अथर्व पवार यांचे देशपातळीवर घवघवीत यश; CAPF परीक्षेत ३२वा क्रमांक

अथर्व पवारांच्या यशाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून कौतुक; असिस्टंट कमांडंटपदी निवडीबद्दल अभिनंदन
बारामतीच्या अथर्व पवार यांचे देशपातळीवर घवघवीत यश; CAPF परीक्षेत ३२वा क्रमांक
बारामती वार्तापत्र
बारामतीचे सुपुत्र अथर्व सुनीता प्रदीप पवार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) परीक्षेत देशात ३२वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
CAPF परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत अथर्व पवार यांची असिस्टंट कमांडंटपदी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अथर्व पवार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अथर्व पवार यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनत, चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेल्या समर्पणाचे फलित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. देशपातळीवरील स्पर्धात्मक परीक्षेत मिळवलेल्या या यशाबद्दल बारामतीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
देशसेवेच्या क्षेत्रात असिस्टंट कमांडंट म्हणून कार्य करण्याची संधी मिळाल्याने अथर्व पवार यांच्या यशाकडे बारामतीतील युवा वर्गासाठी प्रेरणादायी कामगिरी म्हणून पाहिले जात आहे.






