पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर व ट्रॉलीज चोरणाऱ्या चोरट्यांना भिगवण पोलिसांनी केले जेरबंद
११ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर व ट्रॉलीज चोरणाऱ्या चोरट्यांना भिगवण पोलिसांनी केले जेरबंद
११ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
इंदापूर : बारामती वार्तापत्र
पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर व ट्रॉलीज चोरणाऱ्या चोरट्यांना भिगवण पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले असून पोलिसांकडून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
भिगवण पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे, खारतोडे वस्ती पोंधवडी (ता. इंदापूर)येथील महिला शेतकरी अलका नामदेव खारतोडे यांच्या मालकीच्या महिंद्रा कंपनीचा अर्जुन ५५५ मॉडेलचा लाल रंगाचा ट्रॅक्टर अज्ञात चोरट्याने चोरून नेलेबाबत भिगवण पोलीस स्टेशनला गु.र.नं ८८/२०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदरील गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्या वरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन सुनील बिभीषण देवकाते (वय २५) रा.ऐरले ( ता.बार्शी) व महादेव नागेश सलगर रा.उंडेगाव ( ता.बार्शी ) यांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता त्यांनी मौजे पोंधवडी ( ता.इंदापूर ) येथील अलका खारतोडे यांचा ट्रॅक्टर तसेच इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन ट्रॉली चोरून नेलेबाबत पोलीस तपासात उघड झाले असून त्यांच्या ताब्यातून दोन ट्रॅक्टर व दोन ट्रॉली असा एकूण ११ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग बारामती मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती विभाग नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील,पो.ना लोंढे,पो.कॉ उगले,पो.कॉ माने यांनी केली आहे.