
रक्तदान ही काळाची गरज: वैशाली पाटील
भारत फोर्ज मध्ये रक्तदान शिबिर संपन्न
बारामती वार्तापत्र
वाढते अपघात,रुग्णालयात उपचार, शस्त्रक्रिया आदी कारणा साठी रक्ताची आवश्यकता नेहमी लागते आशा प्रसंगी भारत फोर्ज कंपनीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केलं जाते व सातत्य ठेवले जाते हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी केले.
बारामती एमआयडीसी येथील भारत फोर्ज कंपनी मध्ये गुरुवार दि.१३फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबराचे आयोजन करण्यात आहे होते. या प्रसंगी उदघाटक म्हणून वैशाली पाटील बोलत होत्या .
या प्रसंगी कंपनीचे प्रमुख अधिकारी सदाशिव पाटील, अजितकुमार जैन, दिनेश दौंडकर आणि कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किरण खोमणे, सेक्रेटरी रणजित भोसले व इतर संघटना पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्तीत होते.
गेले १२ वर्षांपासून सातत्याने प्रत्येक वर्षी हा स्तुत्य उपक्रम कंपनी तर्फे राबवला जातो.
या वर्षी ५८० बॉटल रक्तदान करून आत्तापर्यंतचे उच्च्याकी रक्तदान करण्यात आले रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन सदाशिव पाटील यांनी सांगितले.