लोक उपयोगी दर्जात्मक विकास कामे करण्याचा आपला प्रयत्न : अंकिता पाटील
१६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

लोक उपयोगी दर्जात्मक विकास कामे करण्याचा आपला प्रयत्न : अंकिता पाटील
१६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न
इंदापूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गोंदी-ओझरे गावांच्या विकासासाठी एकूण १६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१२) करण्यात आले.या भूमिपूजन समारंभासाठी पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना अंकिता पाटील यांनी लोक उपयोगी दर्जात्मक विकास कामे करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे म्हंटले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षण भिंत बांधण्यासाठी ५ लाख रुपये, गणेश मंदिर व लक्ष्मी आई मंदिर सुधारणा करण्यासाठी स्थानिक विकास निधीतून २ लाख ५० हजार रुपये तसेच जिल्हा परिषद सदस्य १५ व्या वित्त आयोग निधीतून पाण्याची टाकी बांधकाम करण्यासाठी २ लाख ५० हजार व जनसुविधा योजनेतून नवीन स्मशानभूमी शेड बांधणे करिता ६ लाख रुपये मंजूर केले आहेत, असे एकूण १६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.