क्राईम रिपोर्ट

वाईन शॉप मध्ये दहशत माजवून खंडणी गोळा करणाऱ्या आरोपीस अटक

दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे.

वाईन शॉप मध्ये दहशत माजवून खंडणी गोळा करणाऱ्या आरोपीस अटक.

दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे.

क्राईम;बारामती वार्तापत्र

बारामती शहर पोलीस ठाणे हद्दीतील कसबा येथील नितीन वाईन्स शॉप मध्ये मॅनेजर व कामगारांना तलवारीचा धाक दाखवून त्यांना काठी व हाताने मारहाण करून, काउंटर फोडून दुकानातून रोख रक्कम व दारू जबरीने चोरून” मी येतील दादा आहे मला दारू चे बिल मागायचे नाही मागितले तर रोडवर समाधी बांधीन” अशी धमकी देऊन दुकानातील गिर्‍हाईकांना मारहाण करून हुसकावून लावणारा कसबा येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आदेश संजय कुचेकर रा.साठेनगर कसबा, बारामती याला बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके पोलीस अंमलदार रामचंद्र शिंदे, दशरथ इंगोले, अजित राऊत यांनी तातडीने ताब्यात घेतले आहे.

व त्याला अटक केली याच भुरट्या गुंडाने दोन महिन्यापूर्वी कसबा भागातील एका युवकावर जीवघेणा हल्ला केलेला होता हा आरोपी त्याचा जोडीदार गणेश गायकवाड व व अनिल खिलारे यांच्या मदतीने त्या भागात दहशत करत आहे . कुचेकर पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर हे दोन भुरटे परागंदा झाले आहेत या आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे. सदर आरोपी वर योग्य ती प्रतिबंधक कारवाई होणार आहे.

त्याच्याविरुद्ध छोट्या-मोठ्या तक्रारी असतील तर तात्काळ पोलीस ठाण्याचे संपर्क करावा.

Related Articles

Back to top button