महाराष्ट्र केसरी किताब इंदापूर तालुक्यातील कुस्तीगिरांनी मिळवावा- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी झालेल्या तालुक्यातील मल्लांचा केला गुणगौरव

महाराष्ट्र केसरी किताब इंदापूर तालुक्यातील कुस्तीगिरांनी मिळवावा- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी झालेल्या तालुक्यातील मल्लांचा केला गुणगौरव
इंदापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र केसरी किताब इंदापूर तालुक्यातील कुस्तीगिरांनी मिळवावा अशी अपेक्षा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली आहे.सातारा येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील सहभागी होऊन उत्तम कामगिरी बजावणाऱ्या कुस्ती मल्लांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि.१४) गौरव करण्यात आला.याप्रसंगी ते बोलत होते.
सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत इंदापूर तालुक्याचे सुपुत्र माऊली कोकाटे यांनी पुणे जिल्ह्याकडून मॅट विभागात फायनल पर्यंत धडक मारली तर माती विभागातून महारुद्र काळेल यांनी चांगली कामगिरी केली तसेच संतोष गावडे व नामदेव कोकाटे यांनी सुवर्णपदक मिळवले. या कुस्तीगीरांचा छोटेखानी कार्यक्रमात सन्मान करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.कुस्ती मल्ल विद्या महासंघ सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष पै. युवराज केचे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.