सोमेश्वर

पुण्याच्या नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा भोर नीरा देवधर धरणात बुडून मृत्यू

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू ला. 

पुण्याच्या नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा भोर नीरा देवधर धरणात बुडून मृत्यू

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू ला.

नीर ;प्रतिनिधि

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आज एक दुर्दैवी घटना घडली असून, नीरा देवधर धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात व्यवस्थापनाचे शिक्षण घेणारे चार विद्यार्थी रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने भोर तालुक्यातील नीरा देवधर धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास हे सर्व विद्यार्थी धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. त्या वेळी परिसरात फारशी वर्दळ नसल्याने मदतीसाठी कोणीही तत्काळ उपलब्ध नव्हते.

पोहताना एका विद्यार्थ्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागल्याचे लक्षात येताच त्याच्या इतर मित्रांनी
त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले परंतु त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला, आपला मित्र बुडत आहे हे पाहून ते आरडाओरडा करून मदतीसाठी हाक मारू लागले, त्यांचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पोचले आणि भोर पोलिसांना तसेच भोईराज जलापती व्यवस्थापन समितीला माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश माने आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. भोईराज जलापती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह धरणाच्या खोल पाण्यातून बाहेर काढला.

मृत विद्यार्थ्याचे नाव देवेश राज मिश्रा (वय अंदाजे २८ वर्षे) असे असून तो सध्या पुण्यातील लोणी काळभोर, हवेली येथे वास्तव्यास होता.

या प्रकरणी भोर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय साळुंखे पुढील तपास करत आहेत.

Back to top button