सोमेश्वर

सोमेश्वरचा ६५ वा गळीत हंगाम सुरू!; नवनिर्वाचित संचालकांच्या हस्ते मोळीपूजन अन् गव्हाण पूजन

शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांना नवी पालवी!

सोमेश्वरचा ६५ वा गळीत हंगाम सुरू!; नवनिर्वाचित संचालकांच्या हस्ते मोळीपूजन अन् गव्हाण पूजन

शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांना नवी पालवी!

बारामती वार्तापत्र 

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या हस्ते गव्हाण पूजन करण्यात आले. नव्या गळीत हंगामाला सुरुवात झाल्याने कारखाना परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या प्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर आणि बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शुभारंभाने सोमेश्वर कारखान्याच्या नव्या गळीत हंगामाला प्रारंभ झाला.

Back to top button