शैक्षणिक

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालय बारामती येथे विद्युत अभियांत्रिकी शाखेमार्फत “वोल्ट्झफेस्ट” २०२५ हा कार्यक्रम जल्लोषात साजरा

स्पर्धेमध्ये एकूण ७०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालय बारामती येथे विद्युत अभियांत्रिकी शाखेमार्फत “वोल्ट्झफेस्ट” २०२५ हा कार्यक्रम जल्लोषात साजरा

स्पर्धेमध्ये एकूण ७०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला

बारामती वार्तापत्र 

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथे विद्युत अभियांत्रिकी शाखा आणि इलिसा यांचे मार्फत “वोल्ट्झफेस्ट” २०२५ हा उपक्रम दिनांक १० व ११ फेब्रुवारी २०२५ रोजी महाविद्यालयात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे विजयकुमार कुलकर्णी, शिर्सुफळ सौरऊर्जा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि ज्ञानेश्वर कुंभार सनस्पार्क सोलारचे संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यामध्ये विविध तांत्रिक शो आणि स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने
१. टेक रंबल २. माइंड मॅरेथॉन ३. रेस एक्स चॅलेंज ४. ऑक्क्षन अरेना ५. एआय-आर्ट गॅलरी ६. गेम्स
७. सर्किट बिल्डिंग ८. रीलफेस्ट ९. स्केच शोडाऊन – कॅड
शालेय स्तरावरील स्पर्धा यामध्ये
१. प्रश्नमुंजाषा स्पर्धा२. पोस्टर प्रेझेंटेशन (शाश्वत विकास ध्येये).

तांत्रिक शो:-१. ड्रोन शो २. ईव्ही शो ३. सोलर शो.
अशा विविध तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण ७०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. तसेच ड्रोन, हायड्रोलिक पावर प्लॅन्ट, पॉवर सब स्टेशन, सोलर पावर प्लॅन्ट, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट, थर्मल पावर प्लॅन्ट अशा विविध उपक्रमांच्या प्रतिकृती तयार करून त्याचे सादरीकरण केले.

शालेय स्तरावरील भित्तिपत्रक प्रदर्शनामध्ये स्वच्छ भारत अभियान, पाणी म्हणजे जीवन, स्वच्छ भारत हरित भारत, ऊर्जेची बचत, आवाज व प्लास्टिक प्रदूषण, सौर ऊर्जा, स्त्रीशक्ती, जागतिक मानसिक आरोग्य, भारतीय सैन्यदल आदि विषयाची माहिती देण्यात आली.

जगदंबा डेव्हलपर्स, स्नेहा इंटरप्राइजेस, पद्मावती डायनिंग हॉल, अमेया इंडस्ट्रीज, सन पार्क सोलर, लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन बारामती, प्रवीण कॉस्मेटिक, शिवन्न्या सेल्स प्रा. लिमिटेड, बिलिव्ह इव्ही स्टोअर, ब्लॅकएक्स सलून, बिट इलेक्ट्रॉनिक सिस्टिम आदी अकरा उद्योगांनी या कार्यक्रमाला प्रायोजकत्व दिले होते.

बक्षीस वितरणाच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता चाचणी विभाग, महावितरण बारामती तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे, प्रा. पूजा जैस्वाल, प्रा.वैशाली देवकाते, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्या लोकांनी या कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून सहभाग घेतला अशा मान्यवर व्यक्तींचा सत्कार महाविद्यालयामार्फत करण्यात आला. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस, सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा यथायोग्य सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक तसेच संशोधक वृत्तीचा विकास व्हावा, त्यांच्यामधील सांघिक भावना वाढावी व स्वतःमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा हा होता. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या समन्वयक वैशाली देवकाते यांनी केली.

तसेच हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्युत अभियांत्रिकी शाखेतील प्रा. रोहित तरडे, प्रा. श्रीमंती रोकडे, प्रा. पवन उपाध्ये, प्रा. दीपक येवले, प्रा. ज्योती कुलकर्णी, प्रा. हाफिज शेख, प्रा. संदीप शेलार,प्रा. शिवाजी रासकर, प्रा. अजिंक्य गोलांडे, प्रा. अक्षय आखाडे व सर्व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग तसेच विद्यार्थी ओमकार मोरे, विशाल झगडे, अभिजित पवार, स्वप्निल रासकर, साहिल पवार या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!