स्टेअरिंग अजित पवार यांच्या हातात असलं तरी त्यांना गाड्या आम्ही पुरवतो संजय राऊत.
छायाचित्रामुळे राजकीय वर्तुळात भलतीच चर्चा रंगली आहे.
स्टेअरिंग अजित पवार यांच्या हातात असलं तरी त्यांना गाड्या आम्ही पुरवतो.
छायाचित्रामुळे राजकीय वर्तुळात भलतीच चर्चा रंगली आहे.
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यांनी ट्विट केलेल्या सूचक छायाचित्रामुळे राजकीय वर्तुळात भलतीच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, छायाचित्रात स्टेअरिंग अजित पवार यांच्या हातात असलं तरी त्यांना गाड्या आम्ही पुरवतो. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या गोटातून संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेला कशी प्रतिक्रिया दिली जातेय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
तसेच उद्धव ठाकरे यांनी आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याची गरज असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. मराठा विना राष्ट्र गाडा न चाले हे विनोबा भावेंचं वाक्य आजही का चलतं ? आज देशाच्या राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण होताना दिसते. शरद पवार यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावं. त्यांच्यात त्या क्षमता आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्राचा चेहरा असतो, राष्ट्राचं राज्यावर लक्ष असते. आता त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात लक्ष घातले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून आज सकाळीच उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात ते म्हणतात, शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. या फोटोचं वैशिष्ट्य म्हणजे उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे एका छोट्या गाडीतून जात असून, त्यामध्ये गाडी अजित पवार चालवत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.