स्वयंघोषित भोंदू मनोहर भोसले याला पाच दिवसाची पोलीस कोठडी
बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून भक्तांची करत होता लूट

स्वयंघोषित भोंदू मनोहर भोसले याला पाच दिवसाची पोलीस कोठडी
बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून भक्तांची करत होता लूट
क्राईम;बारामती वार्तापत्र
स्वयंघोषित भोंदू मनोहर भोसले बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून भक्तांची लूट करणारा आपण बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करीत बारामतीमधील एका व्यक्तीच्या गळ्यातील थायराईड-कॅन्सर बरा करतो, असे सांगून मनोहरमामा भोसले याच्यासह तिघांनी रुग्णाच्या कुटुंबीयांची दोन लाख ५१ हजार रुपये घेऊन फसवणूक केली होती. त्या प्रकरणी शशिकांत सुभाष खरात (रा. साठेनगर, कसबा, बारामती) यांनी ता. ९ सप्टेंबर रोजी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार बारामती पोलिस ठाण्यात मनोहर मामा भोसले, विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओमकार शिंदे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.
मनोहर भोसले याला काल पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सातारा जिल्ह्यातील सालपे येथील फार्म हाऊस मधून आरोपी भोसले यास ताब्यात घेतले हो याते त्याला आज बारामतीतील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश ए जे गिरी यांनी पाच दिवसाची पोलिस कस्टडी दिले आहे शशिकांत खरात राहणार कसबा बारामती यांनी आपल्या वडिलांचा कॅन्सर रोग बरा करण्याकरता त्यासाठी अडीच लाख रुपये दिले होते त्याकरता बाबळी चा झाडपाला खाऊ खावा असे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले यांना काल अटक केली होती.
आज सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यादरम्यान झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यावेळी आरोपी मनोहर भोसले याच्या वतीने अडवोकेट विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला तर पोलिसांच्या वतीने तपास अधिकारी महेश ढवाण यांनी बाजू मांडली.