स्थानिक

अजितदादांच्या अनपेक्षित भेटीने कार्यकर्ते भारावले

सर्व युवक जवळ गेले आणि त्यांनी सांगितले की नवीन व्यवसायाची सुरुवात करतोय दादा आपण भेट द्यावी.

अजितदादांच्या अनपेक्षित भेटीने कार्यकर्ते भारावले

सर्व युवक जवळ गेले आणि त्यांनी सांगितले की नवीन व्यवसायाची सुरुवात करतोय दादा आपण भेट द्यावी.

बारामती वार्तापत्र
पवार कुटुंबीय आणि कार्यकर्ते यांच्यातील जिव्हाळ्याचे ,आपुलकीचे किस्से आपण वेळोवेळी ऐकत असतोच. असाच एक किस्सा आज घडला.

मोरगाव रस्त्यावर विकास कामांची पाहणी करण्याकरता आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा ताफा पाहणी करून निघाला होता. यादरम्यान अक्षय माने या युवकाने त्याच्या व्यवसायाची सुरुवात करत नवीन हॉटेल उभारण्याचे काम सुरू केले आहे. या आपल्या व्यवसायाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भेट द्यावी अशी मनोमन इच्छा त्याने आपल्या मित्रांजवळ व्यक्त केली.

मग ठरले कि अजितदादांच्या ताफ्याला हात करायचा आणि अजित दादांचा ताफा जवळ आल्यावर अक्षयने हात उंचावत दादांना थांबण्याची विनंती केली.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः गाडी चालवत असल्याने त्यांनी या युवकांना पाहिले आणि काहीतरी अडचण असेल म्हणून गाडी थांबवली. सर्व युवक जवळ गेले आणि त्यांनी सांगितले की नवीन व्यवसायाची सुरुवात करतोय दादा आपण भेट द्यावी.

आणि लगेच उपमुख्यमंत्री गाडीतून उतरत या हॉटेल व्यावसायिकाच्या हॉटेलच्या ठिकाणी जात सर्व हॉटेलची पाहणी केली व त्याला योग्य सूचना केल्या. या सर्व प्रकारामुळे आज बारामतीत दादांचे कार्यकर्त्यावर असणाऱ्या प्रेमाची व आपुलकीची चर्चा चालू होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram