अजितदादांच्या जयंतीचा ‘हरित संकल्प’! सहारा फाउंडेशनच्या वतीने बारामतीत वृक्षारोपण
जयंतीनिमित्त ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’चा संदेश

अजितदादांच्या जयंतीचा ‘हरित संकल्प’! सहारा फाउंडेशनच्या वतीने बारामतीत वृक्षारोपण
जयंतीनिमित्त ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’चा संदेश
बारामती वार्तापत्र
दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सहारा फाउंडेशनच्या वतीने बारामतीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. युवा नेते जय पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ हा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील पर्यावरण अधिक समृद्ध करण्यासाठी तसेच आगामी पिढ्यांसाठी हरित आणि निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
अजितदादांच्या जयंतीला पर्यावरण संवर्धनाची सलामी देत बारामतीतून हरित संदेश देण्यात आला.






