स्थानिक

अजित दादांचा रविवारी बारामती तालुक्यात ‘ जम्बो ‘ दौरा

सदर कार्यक्रमत कोव्हिड 19 विषयक नियमावलींचे पालन करून संपुन्न होईल. सोशल डिस्टन्सींग पाळणे व मास्क लावणे अनिवार्य आहे.

अजित दादांचा रविवारी बारामती तालुक्यात ‘ जम्बो ‘ दौरा

सदर कार्यक्रमत कोव्हिड 19 विषयक नियमावलींचे पालन करून संपुन्न होईल. सोशल डिस्टन्सींग पाळणे व मास्क लावणे अनिवार्य आहे.

बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राज्याचे कामकाज पाहत बारामतीतही जातीने विकासकामांवर लक्ष देत असतात. चालू असलेली विकास कामे ,नियोजित विकास कामे याविषयी ते सतत कार्यतत्पर असतात कामे वेळेत व्हावीत, ती उच्च दर्जाची व्हावीत याविषयी ते नेहमीच आग्रही असतात त्यातच रविवारी दिनांक 31 रोजी अजितदादांचा बारामतीचा पूर्ण दिवस दौरा आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे.

स.७.३० वा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.जळोची विस्तारीत कक्ष शाखा उद्घाटन

स.८.०० वा.पल्स पोलीओ लसीकरण शुभारंभ शासकिय महिला हॉस्पीटल,
एमआयडीसी, बारामती, जि.पुणे.

स.८.३० कार्यकर्त्यांसाठी राखीव,व्हिआयआयटी, विद्या प्रतिष्ठान, बारामती.

स.१०.३० वा.मुख्यमंत्री स्वयं रोजगार निर्मिती योजना शुभारंभ,गदिमा सभागृह, विद्या प्रतिष्ठान, बारामती

दु.१२.०० वा.राखीव,विद्या प्रतिष्ठान, बारामती.

दु.२.०० वा. ते सायं.३.४५ वा श्री शंकर नागरी सह. पतसंस्था मर्या. नुतन ऑफिसचे उद्घाटन,

पोलीस चौकीच्या जागेची पाहणी ,

माळेगाव बु. प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन माळेगांव बु., ता.बारामती,
जि.पुणे.,
रमामातानगर येथे समाज मंदिर उद्घाटन रमामातानगर, माळेगांव बु.,

सायं.४.०० वा ते.सायं.४.३० वा. ग्रामपंचायत पणदरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन पणदरे, ता.बारामती, जि.पुणे.

सायं.५.०० वा.बारामती शहरातील स्ट्रीट लाईट, कसबा व स्ट्रॉम वॉटर लाईन, अंबेडकर पुतळयाजवळच्या कामाचे भुमीपूजन बारामती, जि.पुणे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. सेवक निवास सदनिका उद्घाटन पु.जि.म.सह. बँक मर्या., बारामती मुख्यालयाशेजारी, आमराई,बारामती.

नंतर सभा नगरपालिका समोर किंवा नगटराज नाटय कला मंडळ, बारामती.

नंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. देऊळगाव रसाळ,शाखा उद्घाटन देऊळगाव रसाळ, ता.बारामती.

नंतर मोटारीने प्रयाण. असा भरगच्च कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बारामतीत आहे.

Related Articles

Back to top button