अजित पवारचं पुन्हा वादग्रस्त विधान; ‘मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात’
कुणाच्याही टर्ममध्ये एवढी कामे झाली नाहीत
अजित पवारचं पुन्हा वादग्रस्त विधान; ‘मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात’
कुणाच्याही टर्ममध्ये एवढी कामे झाली नाहीत
बारामती वार्तापत्र
बारामती शहर परिसरात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना काही कार्यकर्ते यांनी काही कामं झाली नसल्याची तक्रार केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काही क्षण संतप्त झाल्याचे पहावयास मिळाले.
‘तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, अशा शब्दात पवार यांनी नाराजी व्यक्त करीत संबंधितांना सुनावले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते. तालुक्यातील मेडद येथील पेट्रोल पंपाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना अजितदादा हे नागरिकांवर चांगलेच संतापलेले दिसले. मात्र, त्यांच्या त्या विधानावर राज्यभरातून चांगलीच टीका होताना दिसत आहे.
मेडद येथील कार्यक्रमात बोलत असताना मधूनच नागरिक अजितदादांना निवेदन देत होते. सुरुवातीची एक दोन निवेदने त्यांनी स्वीकारली आणि त्यातील काम आपण मार्गी लावू, असे स्पष्ट करत होते. अधिकाऱ्यांनाही काही सूचनाही करत होते. मात्र, त्यानंतरही येणारे निवेदने पाहून अजितदादा चांगलचे चिडलल्याचे दिसून आले.
रविवारी बारामतीतील एका कार्यक्रमात निवेदन देणाऱ्या नागरिकावर अजितदादा संतापले. ‘तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाहीत झालात. का सालगडी कराल का मला?, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागरिकांवर संताप व्यक्त केला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या विधानावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. हा मतदारांचा अपमान आहे. एवढं दिवस मतदारांमुळेच मला तुम्हाला सत्ता मिळाली. सगळं त्यांचच आहे. लोकांना उपाशी ठेवायचेही ते ठरवतील. लोकांनी मला एवढे दिवस मते दिली तर मी त्यांचा सालगडीच आहे, अशी भावनाही आव्हाड यांनी व्यक्त केली.