इंदापूर

इंदापुरातील जिम ट्रेनरवर रात्री जीवघेणा हल्ला

9 जणांविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंदापुरातील जिम ट्रेनरवर रात्री जीवघेणा हल्ला

9 जणांविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंदापूर; प्रतिनिधी

इंदापूरातील व्यायाम प्रशिक्षक (जिम ट्रेनर) संकेत शशिकांत जाधव (वय 28, रा. तेली गल्ली, इंदापूर) यांना चारचाकी गाडीने धडक देण्याचा प्रयत्न करीत गाडीतून उतरून कोयत्याने, लोखंडी गजाने मारहाण करीत बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी 9 जणांविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

याबाबत संकेत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते सोमवार (दि.16) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास जिममधून आपल्या घराकडे जात असताना चारचाकी गाडीतून आलेल्या संजय सोनवणे, योगेश सोनवणे, संकेत सोनवणे, सुहास सोनवणे, सुनील सोनवणे (सर्व रा. तरडगाव, ता. इंदापूर) यांच्यासह इतर चार जणांनी त्यांच्या ताब्यातील गाडीने धडक देण्याचा प्रयत्न करून त्यांना खाली पाडत दोन्ही गाड्यांच्या मध्ये घेतले. यावेळी संजय सोनवणे यांच्या हातात बंदूक होती. यावेळी फिर्यादीने बंदूक हाताने दूर लोटली. तेवढ्यात योगेश सोनवणे, सुहास सोनवणे, सुनील सोनवणे यांनी रॉड, कोयत्याने फिर्यादीच्या हातापायावर मारहाण केली.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/1-KfcqwqNS4?si=eKzwwEh9BhlZX-a_