“फराळ तोच, दिवाळी तीच; पण अजितदादा नाहीत! राजेंद्र पवार भावूक; म्हणाले, यंदाची दिवाळी चुकल्या चुकल्यासारखी वाटतेय!”
दिवाळी हा केवळ सण नसून कुटुंबातील नाती, एकत्रितपणा आणि आठवणी जपण्याचा आनंद असतो.

“फराळ तोच, दिवाळी तीच; पण अजितदादा नाहीत! राजेंद्र पवार भावूक; म्हणाले, यंदाची दिवाळी चुकल्या चुकल्यासारखी वाटतेय!”
दिवाळी हा केवळ सण नसून कुटुंबातील नाती, एकत्रितपणा आणि आठवणी जपण्याचा आनंद असतो.
बारामती वार्तापत्र |
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर यंदाची दिवाळी पवार कुटुंबीयांसाठी भावनिक ठरत आहे. दरवर्षी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन उत्साहात दिवाळी साजरी करण्याची परंपरा यंदा खंडित झाली आहे. अजितदादांच्या आठवणींनी कुटुंबीय भावूक झाले असून, अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“यंदाची दिवाळी चुकल्या चुकल्यासारखी वाटत आहे,” अशा शब्दांत राजेंद्र पवार यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, पूर्वीपासून आमच्या कुटुंबात सर्वजण एकत्र येऊन दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. पवार साहेबांच्या आजारपणामुळे ते मुंबईतील सिल्व्हर ओक येथे असतील, तर आमचे कुटुंब बारामतीत असेल. इतर भावंडेही आपापल्या ठिकाणी असतील. रोहित पवार यांचाही सध्या दुष्काळ पाहणी दौरा सुरू आहे.
दरवर्षी एकत्रितपणे साजरा होणारा दिवाळीचा सण यंदा मात्र अजितदादांशिवाय साजरा होत असल्याने मनात एक वेगळीच पोकळी निर्माण झाली आहे. कुटुंबातील सर्वजण एकत्र असण्याचा आनंद आणि सणाचा उत्साह यंदा अनुभवता येत नसल्याची खंतही राजेंद्र पवार यांनी व्यक्त केली.
दिवाळी हा केवळ सण नसून कुटुंबातील नाती, एकत्रितपणा आणि आठवणी जपण्याचा आनंद असतो. मात्र, अजितदादांच्या अकाली निधनामुळे यंदा पवार कुटुंबीयांसाठी हा आनंद काहीसा अपूर्ण राहिला आहे. राजेंद्र पवार यांच्या भावनिक शब्दांतून अजितदादांची कुटुंबातील उणीव आणि त्यांच्या आठवणींची तीव्रता प्रकर्षाने समोर आली आहे.






