अजित पवारांनी दिलं धनंजय मुंडेंच्या प्रकृतीसंदर्भात अपडेट, म्हणाले…हृदयविकाराचा झटका नव्हे तर फक्त भोवळ
पवार म्हणाले की, त्यांना डॉक्टरांनी आरामाची गरज असल्याचं सांगितलं आहे.

अजित पवारांनी दिलं धनंजय मुंडेंच्या प्रकृतीसंदर्भात अपडेट, म्हणाले…हृदयविकाराचा झटका नव्हे तर फक्त भोवळ
पवार म्हणाले की, त्यांना डॉक्टरांनी आरामाची गरज असल्याचं सांगितलं आहे.
मुंबई :’प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज त्यांची भेट घेऊन विचारपूस केल्यानंतर माध्यमांना मुंडे यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. ‘धनंजय मुंडे यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची बातमी चुकीची आहे, त्यांना भोवळ आली होती,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, धनंजय मुंडेंची तब्येत स्थिर आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवलं आहे. दुपारी त्यांना वार्डमध्ये शिफ्ट करतील, त्यांना विश्रांती घ्यायला सांगितलं आहे. त्यांना भोवळ आली आहे. एमआरआय करण्याचं काम सुरू आहे. त्यांना कोणतंही पथ्य नाही, घाबरण्याचं कारण नाही असं ते म्हणाले. उद्या बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. त्यांच्या विभागाचा कार्यक्रम आहे. आम्ही कार्यक्रम करतो असं त्यांना सांगितलं आहे, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, त्यांना डॉक्टरांनी आरामाची गरज असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे इकडे येऊ नका, धनंजय मुंडे लवकर बरे व्हावे असं वाटतं असेल तर तिथूनचं शुभेच्छा द्या. आम्ही इथं लक्ष ठेऊन आहोत, असं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. मी डॉक्टरांना सांगितलंय की तुमचं समाधान होईपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज करु नका, असंही ते म्हणाले.
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आवाहन
धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबतचे वृत्त पसरल्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तसंच काही कार्यकर्ते धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मुंबईत न येण्याचं आवाहन केलं आहे. डॉक्टरांनी सध्या मुंडे यांना आराम करण्याचा सल्ला दिला असून कोणालाही भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मुंबईत न येता जिथे आहेत तिथूनच त्यांना शुभेच्छा द्याव्यात, असं अजित पवार म्हणाले.दरम्यान, उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी धनंजय यांना भेटल्यानंतर सांगितलं की, तुम्ही काहीही काळजी करू नका, आम्ही सर्वजण मिळून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडू, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली आहे.