स्थानिक

ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कारखेल येथे प्रशिक्षण शिबीर संपन्न

उद्यान कन्या स्नेहा गायकवाड यांनी विविध विषयांवर दिले प्रशिक्षण

ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कारखेल येथे प्रशिक्षण शिबीर संपन्न

उद्यान कन्या स्नेहा गायकवाड यांनी विविध विषयांवर दिले प्रशिक्षण

बारामती : प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी, फलटण, यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बारामती तालुक्यातील कारखेल येथे उद्यान कन्या स्नेहा रमेश गायकवाड हिने गावातील ग्रामपंचायत आवारात तसेच गावात वृक्षारोपण केले तसेच या गावामध्ये वेगवेगळ्या विषयांवर शेतकरी वर्ग भरवले,गावातील युवकांना विविध विषयांवर प्रशिक्षण दिले. कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सातव्या सत्रात गावामध्ये १ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून एकात्मिक क्रीडा नियंत्रण, एकात्मिक रोग नियंत्रण, एकात्मिक खतांचा वापर, मृदा प्रशिक्षण, इ. विषयांवर शेतकरी वर्ग या माध्यमातून मार्गदर्शन केले. या वेळी गावच्या सरपंच रूपाली चव्हाण तसेच रमेश गायकवाड, महेश भापकर, यशवंत भापकर, व इतर गावकरी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी स्नेहा गायकवाड हिला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री निंबाळकर सर, प्रा. जयेश लेंभे सर, प्रा. पाटील सर, प्रा.शहा सर, प्रा. रणवरे सर, प्रा. शिंदे सर., प्रा. बनकर सर, यांचे विषेश मार्गदर्शन लाभले.

Check Also
Close
Back to top button