अनेकान्त एज्युकेशन सोसायटी, बारामतीच्या अध्यक्षपदी मा.श्री.जवाहर मोतीलाल शाह (वाघोलीकर) यांची निवड
या पंचवार्षिक निवडणूकीचे निवडणूक अधिकारी म्हणून शारदानगर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी साठे यांनी कामकाज पाहिले.

बारामती वार्तापत्र
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या दि. ०४ जून २०२१ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये पुढील पाच वर्षाकरिता संस्थेच्या नियामक मंडळाची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी श्री.जवाहर मोतीलाल शाह (वाघोलीकर), सचिवपदी श्री.मिलिंद राजकुमार शाह (वाघोलीकर) व खजिनदारपदी श्री.सुनील शिवलाल शहा (लेंगरेकर) यांची निवड झाली. त्याचबरोबर या कार्यकारिणीमध्ये श्री.चंद्रगुप्त माणिकलाल शाह (वाघोलीकर), श्री.विकास शशिकांत शहा (लेंगरेकर), श्री.चंद्रवदन विद्याचंद्र शहा (मुंबईकर), श्री.विद्युतकुमार माणिकचंद शहा, डॉ.हर्षवर्धन सूर्यकांत व्होरा, श्री.सत्यजित शांतीलाल शहा (पंदारकर) यांची सन्माननीय सदस्य म्हणून निवड झाली.
या पंचवार्षिक निवडणूकीचे निवडणूक अधिकारी म्हणून शारदानगर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी साठे यांनी कामकाज पाहिले.
श्री.जवाहर मोतीलाल शाह (वाघोलीकर) यांनी सचिवपदाचा १९९९ साली पदभार स्वीकारला व त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाची घोडदौड वेगाने सुरु झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेकान्त इंग्लिश मिडीयम स्कुल, अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडीज या नावाजलेल्या संस्था सुरु झाल्या. या सर्वांच्या आजपर्यंतच्या कार्याचा तसेच नवनियुक्त सदस्यांच्या कामकाजाचा अनुभवाचा फायदा अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या पुढील प्रगतीच्या वाटचालीस नक्कीच होईल.
नवनिर्वाचित नियामक समितीच्या कार्यास अनेकांत एज्यकेशन सोसायटीचे सदस्य, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, अनेकान्त इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कुल या सर्व संस्थांमधील प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
प्राचार्य