खोटे गुन्हे न हटवल्यास दि. 12 जुलै रोजी अखंड महाराष्ट्रभर शिवधर्म फाउंडेशन च्या वतीने तीव्र आंदोलन करणार ….भाऊसाहेब आंधळकर
अशोक जिंदाल प्राथमिक उपचार घेऊन माझ्या छातीत दुखत असून पुढील उपचाराकरता ते पुण्यासाठी निघून गेले

खोटे गुन्हे न हटवल्यास दि. 12 जुलै रोजी अखंड महाराष्ट्रभर शिवधर्म फाउंडेशन च्या वतीने तीव्र आंदोलन करणार ….भाऊसाहेब आंधळकर
अशोक जिंदाल प्राथमिक उपचार घेऊन माझ्या छातीत दुखत असून पुढील उपचाराकरता ते पुण्यासाठी निघून गेले
बारामती वार्तापत्र;निलेश भोंग; प्रतिनिधी
अशोक जिंदल यांच्या इंदापूर टेंभुर्णी तसेच सातारा येथे कंपनी असून यापूर्वी त्यांच्याकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांचे बद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. उदयनराजे हे अखंड महाराष्ट्राचे दैवत असून अखंड महाराष्ट्रातील शिवप्रेमी यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून दिपक आण्णा काटे व त्यांचे साथीदार यांनी याच तळमळीने जाब विचारण्यासाठी गेले असता अशोक जिंदाल यांनी अरेरावी करून हुज्जत घातली आणि त्यातून त्यांना काळे फासणे तसेच पोलीस स्टेशनला आणण्यात आले. व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बद्दल अवमानकारक भाष्य केले च्या विरोधात तक्रार दिली त्याच प्रमाणे जिंदाल यांनीही मारहाणीची तक्रार देऊन दीपक आण्णा काटे व त्यांच्या इतर साथीदारांना अटक करण्यात आली.
अशोक जिंदाल प्राथमिक उपचार घेऊन माझ्या छातीत दुखत असून पुढील उपचाराकरता ते पुण्यासाठी निघून गेले. परंतु अशोक जिंदाल यांना इंदापूर पोलिस स्टेशनला आणण्यात आले त्यावेळी सर्व प्रकार लाईव्ह करण्यात आला होता. आणि लाईव्ह मध्ये कुठल्याही प्रकारचा दरोडा पडत नसतो. असे मत भाऊसाहेब आंधळकर यांनी व्यक्त केले.
जिंदाल यांनी राजकीय दबाव आणून एका घटनेत एकच गुन्हा दाखल केला जात असताना वरिष्ठ पोलिसांच्या सहकार्याने दबाव आणून दुसऱ्या दिवशी मुलाच्या फिर्यादीवरून दरोड्या यासारखा अपात्र गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये रोख रक्कम हिऱ्याची अंगठी, घड्याळ तसेच इतर ऐवज काढून घेतला असे सांगण्यात आले. ज्यावेळी जिंदाल यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले होते यावेळी त्यांनी दरोड्याची तक्रार का दाखल केली नाही असा सवाल आंधळकर यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर त्यांना ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले त्यावेळी चे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी हे करण्यात आली.
ज्या व्यक्तीने साबळे यांना अमरण उपोषण करून संभाजी बिडी हे नाव बदलण्यास भाग पाडले. असा हा युवक महाराष्ट्राचा गोरगरीब जनतेचा आशाकिरण असून युवकांचे प्रेरणास्थान आहे. त्याच्यावरती जर अन्याय होत असेल तर महाराष्ट्रातील शिवप्रेमी हा अन्याय सहन करणार नाहीत. माझी पोलीस प्रशासनास विनंती आहे की, या प्रकरणांमध्ये जो घडलेला प्रकार आहे तो निंदनीय खोटा असून पूर्ण महाराष्ट्राच्या युवकांचे आशास्थान असणारे दीपक अण्णा काटे व त्यांच्या साथीदारांवरील दरोड्याचे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच या पूर्ण प्रकरणाची योग्य तपासणी करावी तसे न झाल्यास दि. 12 जुलै रोजी माऊली चौक येथे रस्ता रोको करून पूर्ण महाराष्ट्र भर शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.