स्थानिक

झैनबिया इंग्लिश मिडीयम स्कुल, बारामती – कटफळ. येथील विद्यार्थ्यांनी केला SLC कार्यक्रम उत्साहात साजरा….

उपस्थित मान्यवरांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.

झैनबिया इंग्लिश मिडीयम स्कुल, बारामती – कटफळ. येथील विद्यार्थ्यांनी केला SLC कार्यक्रम उत्साहात साजरा….

उपस्थित मान्यवरांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.

बारामती वार्तापत्र

दिनांक 27 /2/2022 वार रविवार रोजी झैनबिया इंग्लिश मिडीयम बारामती-कटफळ येथील विद्यार्थ्यांनी SLC हा कार्यक्रम अगदी उत्साहात साजरा केला. नर्सरी ते इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांनी विषय शिक्षकांच्या साहाय्याने लीड अभ्यासक्रमानुसार अत्यंत प्रभावीपणे डेमो सादरीकरण केले.

तसेच सहाय्यक शिक्षकांच्या मदतीने कराटे तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. कोरोना या महा भयंकर महारामरीनंतर विद्यार्थ्यांना मिळालेल्या या संधीचे सोने करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांनी उत्साहाची पराकाष्ठा केलेली दिसून आली.

कार्यक्रमाला श्री. ठेंगल एन.डी. सहसचिव पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ. मुख्याध्यापक श्री. छत्रपती हायस्कुल, निंबोडी. अध्यक्ष- राष्ट्रवादी तालुका शिक्षक सेवा . तसेच शेख एस्. पी. अध्यक्ष- बारामती मुख्याध्यापक तालुका संघ. मुख्याध्यापक उर्दू माध्यमिक विद्यालय, बारामती. सचिव – राष्ट्रवादी तालुका शिक्षक सेवा.

यांची उपस्थिती लाभली. यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले. उपस्थित मान्यवरांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.

अशा प्रकारे हा SLC कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाने व शिक्षक वृंद यांच्या साहाय्याने नियोजनबद्ध, सर्व नियमांचे पालन करून उत्साहात साजरा झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button