आद्यक्रांतीवीर राजेउमाजी नाईक यांचा खरा इतिहास जगा समोर आला पाहिजे – नानासाहेब चव्हाण
इंदापूरात उमाजीराजेंची जयंती उत्साहात साजरी

आद्यक्रांतीवीर राजेउमाजी नाईक यांचा खरा इतिहास जगा समोर आला पाहिजे – नानासाहेब चव्हाण
इंदापूरात उमाजीराजेंची जयंती उत्साहात साजरी
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातील रामोशी गल्ली येथे मंगळवारी ( दि.७ ) आद्यक्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांची २३० वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कोरोना काळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अमोल पाटोळे,हेमंत पवार,अक्षय ढावरे,संभाजी कांबळे,नितीन लोंढे,नंदू खंडाळे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याच बरोबर महिलांना विविध देशी वृक्षांचे वाटप करून छोटेखानी प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला.
प्रसंगी बोलताना भारत मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नानासाहेब चव्हाण म्हणाले की, कर्मकांडापासून दूर राहा. मुलांना शिक्षण देऊन उच्चशिक्षित करा, महापुरुषांचे विचार त्यांच्या मनामध्ये रुजवा तरच भविष्य घडेल. उमाजीराजेंचा जो खरा इतिहास आहे तो पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. बहिर्जी नाईक, हरी मकाजी नाईक, लक्ष्मण नाईक, खाशाबा जाधव,तात्यासाहेब रोडे, विद्यादेवी सावित्रीबाई रोडे यांचा दैदिप्यमान इतिहास तरुणांना आणि महिलांना समजला पाहिजे.रामोशी समाज केंद्रात ओबीसीमध्ये येतो.केंद्रातील ओबीसी आरक्षण समाजाच्या दृष्टीने महत्वाचं आहे.त्यामुळे ओबीसी आरक्षणास समर्थन दिलं पाहिजे,तरच समाजाची उन्नती होईल.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे, राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुखदेव चव्हाण, ॲड.किरण लोंढे,अजिंक्य जावीर, वसीम शेख,नागेश भोसले,शुभम पवार,रोहित ढावरे,अभिजित अवघडे,आकाश पाटोळे,विजय भंडलकर,सचिन पलंगे, गणेश मदने,विजय पटोळे,अभिषेक चव्हाण,आझाद सय्यद, संतोष क्षिरसागर,विष्णू पवार,संतोष शिंदे,सुरेश मखरे,नागेश शिंदे,किरण मंडले,आकाश पवार उपस्थित होते.