स्थानिक

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटीचे रहस्य काय? राजकीय वर्तुळात चर्चा

उपमुख्यमंत्र्यांची घेतली तिसऱ्यांदा भेट

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटीचे रहस्य काय? राजकीय वर्तुळात चर्चा

उपमुख्यमंत्र्यांची घेतली तिसऱ्यांदा भेट

बारामती वार्तापत्र
सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेत बंद खोलीत सुमारे दीड तास चर्चा केली. त्यामुळे या भेटी मागचे रहस्य काय याविषयी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

भोसले यांनी आतापर्यंत तीन वेळा अजितदादांची भेट घेतली आहे. तर एकदा खासदार शरद पवार यांना भेटले आहेत. त्यातही आजची बंद खोलीत झालेली चर्चा यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी साताऱ्यातील महत्वाच्या विकास कामांसाठी अजित दादांची भेट घेतली आहे. यामध्ये विशेष काही नाही असे सांगून ते सातारला रवाना झाले.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भेटीमुळे मात्र राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे येणाऱ्या काळातच या भेटीचे रहस्य उलगडणार आहे

Back to top button