इंदापूरच्या तहसीलदार व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांवर केला प्रश्नांचा भडिमार
इंदापूरच्या तहसीलदार व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांवर केला प्रश्नांचा भडिमार
बारामती वार्तापत्र
शिवसेना राज्यात सत्तेत असताना सुद्धा इंदापूर तालुक्यातील कोणत्याही विषयात शिवसेनेला विचारात घेतले जात नाही असा आरोप नेहमीच शिवसेनेच्यावतीने केला जात होता, परंतु शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी तहसील कचेरी येथे केलेल्या पत्र व्यवहारात त्यांना माहिती उपलब्ध करून दिलीनाही त्यामुळे
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे, उपजिल्हाप्रमुख महेश उपजिल्हाप्रमुख संजय काळे, समन्वयक विशाल बोंद्रे,जिल्हा समन्वयक भीमराव भोसले, इंदापूर तालुका प्रमुख नितीन शिंदे, शहर प्रमुख महादेव सोमवंशी, दूर्वाश शेवाळे,व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी इंदापूर येथील तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला, यावर तहसीलदार सोनाली मेटकरी व उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली.