इंदापूर

इंदापूरमध्ये प्रतिबंधित मांगुर माशांवर पोलिसांची मोठी कारवाई.

६ टन मांगुर मासे आणि आयशर टेम्पोसह १९ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

इंदापूरमध्ये प्रतिबंधित मांगुर माशांवर पोलिसांची मोठी कारवाई.

६ टन मांगुर मासे आणि आयशर टेम्पोसह १९ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

इंदापूर;प्रतिनिधि

इंदापूर तालुक्यातील शहा गावात प्रतिबंधित मांगुर माशांची अवैध वाहतूक उघडकीस आणत इंदापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

या कारवाईत सुमारे ६ टन प्रतिबंधित मांगुर मासे आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला आयशर टेम्पो असा एकूण १९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी संबंधित दोघांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिबंधित मांगुर माशांची बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली असून, या प्रकरणातील इतर संबंधितांचा शोध सुरू आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D