इंदापूरात पुन्हा कोरोनाचा कहर.
19 नव्या रुग्णांची भर.
*इंदापूर:-प्रतिनिधी*
दि.4 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या 32 जणांच्या कोरोना चाचणी पैकी आज सकाळी एकूण पाच जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
दरम्यान आज कोविड केअर सेंटर (CCC) येथे एकूण 25 जणांचे स्वब घेण्यात आले होते. त्यापैकी आज सायंकाळी आलेल्या अहवालानुसार तब्बल 19 जणांचे कोरोना चाचणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्ये इंदापूर शहरातील 17 तर भिगवण येथील 2 जणांचा समावेश असल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.
दिवसेंदिवस इंदापूर तालुक्यातील वाढणारी रुग्णांची संख्या बघता तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून कोरोनाग्रस्त रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या बघता लवकरच 300 चा आकडा पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.