इंदापूर तालुक्यातील चाकाटी गावाने मिळवला आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार
जिल्ह्यातील प्रथम क्रमांकासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत गाव पाहणी
इंदापूर तालुक्यातील चाकाटी गावाने मिळवला आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार
जिल्ह्यातील प्रथम क्रमांकासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत गाव पाहणी
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात २०२१-२२ या कालावधीत राबविण्यात आलेल्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारात निरा नदी किनारी वसलेल्या चाकाटी गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.तालुकास्तरीय समितीकडून करण्यात आलेल्या गुणांकन व मूल्यांकनाच्या आधारे चाकाटी गावाला प्रथम क्रमांक देण्यात आला.तर जिल्ह्यातील प्रथम क्रमांकासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत गुरुवारी (दि.२) गावाची पाहणी करण्यात आली.
या भेटीमध्ये चाकाटी गावातील अंतर्गत स्वच्छता,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, जिल्हा परिषद शाळा,अंगणवाडी,वैयक्तिक शौचालय , शोषखड्डे, बायोगॅस, ग्रामपंचायत सर्व अभिलेख ,रोजगार हमी योजनेची कामे, इत्यादीची पाहणी पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासनाचे कमलाकर रणदिवे,इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी केली.
यावेळी ज्येष्ठ नेते केशव मारकड, सोसायटीचे चेअरमन रामचंद्र मारकड,ग्रामपंचायत सदस्य आबासो मारकड, ग्रामपंचायत सदस्य समाधान घोडके, पोलीस पाटील भालचंद्र मारकड, संजय रुपनवर, विजय बबन मारकड, केशव वाघमोडे, महेंद्र कांबळे ,लखन घोडके, गणपत मारकड, ग्रामसेवक स्वप्निल गायकवाड व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रसंगी बोलताना सरपंच संजय बबन रुपनवर म्हणाले की, चाकाटी गावाची आर. आर .(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारात निवड होण्यामागे चाकाटी गावातील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, अधिकारी आणि ग्रामसेवक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या सहकार्याने या गावाची इंदापूर तालुक्यात व आत्ता पुणे जिल्ह्यामध्ये सुंदर गाव म्हणून ओळख निर्माण झाली.पुणे जिल्हामध्ये चाकाटी गावाची सुंदर गाव म्हणून निवड होईल अशी अपेक्षा आहे.या निवडीमुळे चाकाटी गावाच्या विकासाचा कायापालट होईल. गावात याआगोदर शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून विकास कामे झाली असून ही विकास कामे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून तसेच इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर यांच्या सहकार्याने मंजूर करून करण्यात आली आहेत.यामुळे सुंदर गाव करण्यासाठी यांचाही मोलाचा वाटा लाभला आहे.