मुंबई

महान गायिका लता मंगेशकर यांच्या निधनामुळे,दुखवटा सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

वयाच्या 92 व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात कोरोना व्हायरसशी लढा देताना निधन

महान गायिका लता मंगेशकर यांच्या निधनामुळे,दुखवटा सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

वयाच्या 92 व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात कोरोना व्हायरसशी लढा देताना निधन

मुंबई ;प्रतिनिधी

महान गायिका लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी  रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

पश्चिम बंगालमध्ये सोमवारी अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल सरकारने देखील 7 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबईच्या शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Back to top button