इंदापूर

इंदापूर तालुक्यात घरफोडी…

३ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास....

इंदापूर तालुक्यात घरफोडी…

३ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास….

बारामती वार्तापत्र क्राईम रिपोर्ट

इंदापूर तालुक्यातील रुई येथे घरफोडी करून घरातील ३ लाख ६३ हजार ८० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमोल बापुराव मारकड (वय २६ वर्ष, हॉटेल व्यवसाय रा.रुई ता.इंदापुर) यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चोरीस गेलेला मुद्देमाल…..

दाखल फिर्यादीनुसार इंदापूर तालुक्यातील रुई येथील अमोल मारकड यांच्या घराचे कुलूप उचकटून घरातील रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे. यामध्ये २४ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅमची अंगठी,  १ लाख ८ हजार ४८० रुपये किमतीचे  २ तोळे २६० ग्रॅम सोन्याच्या 2 साखळ्या, ३३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे बदाम , ९६ हजार रुपये किमतीचे कानातील झुबे, फुले, ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, व ४८ हजार रुपये किमतीची एक बोरमाळ, ३ हजार रुपये किमतीच्या पट्ट्या व २ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ६३ हजार ८० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अहवाल न्यायालयाकडे रवाना….

दाखल फिर्यादीवरून वालचंदनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दाखल गुन्ह्याची वर्दी अहवाल न्यायालयाकडे रवाना केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पो.स.ई.धोतरे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram