मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे घरपट्टी माफीची घोषणा केली तशी उपमुख्यमंत्री बारामतीत घरपट्टींना लावलेली शास्ती माफ करतील का?
काहींना पगारामध्ये 50 टक्के कपातीला सामोरे जावे लागले

मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे घरपट्टी माफीची घोषणा केली तशी उपमुख्यमंत्री बारामतीत घरपट्टींना लावलेली शास्ती माफ करतील का?
काहींना पगारामध्ये 50 टक्के कपातीला सामोरे जावे लागले
बारामती वार्तापत्र
महानगरपालिका हद्दीत 500 स्क्वे.फूटापर्यंतच्या घरांना राज्याचे मुख्यमंत्री यांनी माफीची घोषणा केली तशी बारामती नगरपरिषदेत हद्दीतील घरपट्टी धारकांना घरपट्टीवर लावलेली शास्ती माफ करतील का? असा प्रश्र्न सर्वसामान्य बारामतीतील नागरीकांना पडलेला आहे.
बारामती नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते सुनिल सस्ते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना चालू आर्थिक वर्षातील बारामती नगरपरिषद हद्दीतील नागरीकांना घरपट्टीच्या शास्तीतून मुक्ती मिळणेबाबतचा लेखी निवेदन दिले आहे. याबाबत बारामती शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगभरात कोवीड-19 ने थैमान घातलेले आहे. मागील दोन वर्षात शहरातील व्यापार ठप्प असुन अनेकांना रोजगारापासून मुकावे लागलेले आहे. काहींना पगारामध्ये 50 टक्के कपातीला सामोरे जावे लागले. या सर्व परिस्थितीचा विचार करून मुख्यमंत्र्यांप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांनी बारामतीतील नागरीकांसाठी घरपट्टी माफी नव्हे तर त्यावर नगरपरिषद लावीत असलेली शास्ती माफ करावी असे म्हटले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी तशी सूचना नगराध्यक्षांना करावी असेही म्हटले आहे. या निवेदनाची प्रत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना दिलेली आहे.
नगरपरिषदेत घरपट्टीवर जी शास्ती लावण्यात येते ती म्हणजे भीक नको कुत्र आवर अशी अवस्था आहे. घरपट्टी वेळेत न भरल्यास त्यावर नगरपालिका चक्रवाढ व्याजावर व्याज लावते त्यामध्ये कित्येक नागरीकांच्या घरपट्टी बरोबर शास्ती कराची रक्कमच दुपटी,तिपटीने आहे ती माफ केल्यास सर्वसामान्य नागरीक घरपट्टी भरेल व बारामती नगरपरिषदेचा महसुल वसुल होईल हा उद्देशाने विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना निवेदन सादर केले आहे.