कोरोंना विशेष

इतिहासात प्रथमच धार्मिक अधिवेशन ऑनलाइन संपन्न.

आधुनिक तंत्रज्ञान चा आविष्कार व सर्वांची उपस्तीती हेच खास वैशिष्ट्य होय.

इतिहासात प्रथमच धार्मिक अधिवेशन ऑनलाइन संपन्न.

आधुनिक तंत्रज्ञान चा आविष्कार व सर्वांची उपस्तीती हेच खास वैशिष्ट्य होय.

बारामती वार्तापत्र :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्याच जीवनात विविध बदल होत आहे, धार्मिक संघटनांनाही आता आधुनिकतेची कास धरण्यास प्रारंभ केला असून, पुलकमंचाचे राष्ट्रीय अधिवेशन व्हर्च्युअल पद्धतीने ऑनलाईन केले गेले. इतिहासात पहिल्यांदाच असे धार्मिक अधिवेशन ऑनलाईन झाल्याने त्याची वेगळी नोंद घेतली गेली.

रविवारी (ता. ३१) पुलकमंचाच्या झोन सातचे अधिवेशन ऑनलाईन पध्दतीने झाले. डॉ. वर्षा कोठारी, अतुल गांधी, धवल शहा (वाघोलीकर), राजेंद्र सरगर यांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले.
पुणे, औरंगाबाद, नातेपुते, नीरा, लोणंद, बारामती यासारख्या ठिकाणचे मोजकेच कार्यकर्ते यात सहभागी झाले. आचार्य श्री पुलकसागरजी महाराजांनीही या अधिवेशनामध्ये सर्वांना मार्गदर्शन केले. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी शासकीय संस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपापल्या गावातून या अधिवेशनात सहभागी झाल्याची माहिती राष्ट्रीय जैन महिला जागृती मंचाच्या महामंत्री प्रियांका दोशी यांनी दिली. बारामतीच्या शाखेला झोन सात अंतर्गत सर्वोत्कृष्ट शाखेचे पारितोषिक नुकतेच प्राप्त झाले आहे. बारामती पूलक मंचचे मोरेश्वर पाठक व अमोल दोशी व महिला मंचच्या संगीता वाघोलीकर, कीर्ती पहाडे यांना शाखेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले.या अधिवेशनच्या मुख्य अतिथी शोभाताई धारिवाल, पूलक मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद फांदोत, महामंत्री प्रदिप जैन, कार्याध्यक्ष सुनील काला, अंकित जैन, चन्द्र प्रकाश बौद तसेच महिला मंचाचे राष्ट्रीय अध्यक्षा मीना झाझरी, महामंत्री बिना टोंग्या, कार्याध्यक्षा पूनम विनायका उपस्थित होते. आभार धवल शहा (वाघोलीकर) यांनी मानले. अधिवेशनचे संचालन प्रियांका दोशी यांनी केले. या आगळ्या वेगळ्या अधिवशेन चे विशेष कौतुक होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram