स्थानिक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व्हीआर बॉयलर्स सोल्युशनचे उदघाटन

या उद्योगामुळे १०० तरुणांना रोजगार मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व्हीआर बॉयलर्स सोल्युशनचे उदघाटन

या उद्योगामुळे १०० तरुणांना रोजगार मिळणार आहे.

बारामती वार्तापत्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरात उभारण्यात आलेल्या व्हीआर बॉयलर्स सोल्युशनचे उदघाटन करण्यात आले.

जिद्द चिकाटी च्या जोरावर नौकरी सोडून स्वतःचा उद्योग उभारून ग्राहकास उत्तम सेवा देत असताना अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे व्ही आर बॉयलर प्रा. ली. कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले

यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, व्हीआर बॉयलर्स सोल्युशनचे राजेश सातपुते व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बॉयलर रीपेरींग आणि पाईप फाब्रिकॅशेन चे काम बॉयलर साठी लागणारी चिमणी बनविणे तसेच पेंटिंग करून देणे,बॉयलर ऑपरेशन आणि वार्षिक मेंटेनन्स त्यासाठी लागणारे सर्व मटेरियल पुरवठा बॉयलर साठी लागणारे सर्व आय बी आर वॉल आणि माउंटिंग फिटिंग
बॉयलर आणि स्टीम पाईपिंग साठी लागणारे इन्सुलेशन चे मटेरियल जसे की एलआरबी हॉट इन्सुलेशन आणि अल्युमिनियम कॅलॅडींग व त्या कामाकरीता लागणारे कुशल कामगार वर्ग, बॉयलर फर्णेस रीफॅक्टरी साठी लागणाऱ्या फायर ब्रिक आणि रिफॅक्टरी सिमेंट व त्या कामाकरीता लागणारे कुशल कामगार वर्ग, नवीन प्लांट कंपनी उभारणीसाठी लागणाऱ्या मशीनरी बसिवणे त्या साठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या पाईप लाईन तैयार करणे शेड उभारून देणे तसेच सर्व प्रकारच्या मशीनरी इरेक्शन कमिस्निंग करून प्लांट चालू करून देणे अशा प्रकारे सर्व काम व्ही आर बॉयलर च्या माध्यमातून केली जात असल्याचे संचालक राजाराम सातपुते यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले
उपसितांचे स्वागत गौरव सातपुते सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले.

या उद्योगामुळे १०० तरुणांना रोजगार मिळणार आहे. यात स्थानिकांनादेखील सामावून घेण्यात यावे, असे श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.

Check Also
Close
Back to top button