
पवार साहेबांना भेटायला ‘ तो ‘ चालला तब्बल 600 किमी अंतर
पवार साहेबांनी दिली भेट
बारामती वार्तापत्र
पवार साहेबांना भेटायला ‘ तो ‘ चालला तब्बल 600 किमी अंतर
पवार साहेबांनी दिली भेट
बारामती वार्तापत्र
नेत्यावर कार्यकर्त्याचे किती प्रेम असते, एखाद्या व्यक्तीवर जिव जडला तर तो किती जडतो याचे उत्तम उदाहरण नुकतेच बारामतीकरांनी अनुभवले. यवतमाळ जिल्ह्यातील जवळा तालुका आर्णी येथील संजय खंदारे हा शेतकरी पवार साहेबांना यांच्या वाढदिवसा निमित्त भेटून शुभेच्छा द्यायच्या हा निर्धार करून यवतमाळ वरून बारामती च्या दिशेने चालत निघाला. हे अंतर थोडेथोडके नव्हे तर तब्बल 600 किमीचे होते पण पवार साहेबांच्या भेटीची आस लागलेल्या या शेतकऱ्याने 19 नोव्हेंबर रोजी आर्णी तालुका येथून पायी चालत येऊन 12 डिसेंबरला पवार साहेबांच्या काटेवाडी या गावी पोहोचला.
यानंतर पवार साहेबांच्या गोविंद बाग याठिकाणी जाऊन साहेबांची भेट घ्यायची असा निर्धार केला मात्र साहेब मुंबईला असल्यामुळे त्यांना भेटता येणार नाही. पण बारामतीतील संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड व राज्याचे कोषाध्यक्ष अमोल काटे यांनी साहेबांना फोनवरून ही हकीकत सांगितली .मग पवार साहेबांनीही या शेतकऱ्यासाठी मुंबईहून पुण्याला येतो असे सांगून तब्बल दोन तास या अवलिया शेतकऱ्याशी शेतीप्रश्नावर चर्चा केली. त्यामुळे संजय खंदारे यांनी जीवनाचे सार्थक झाल्याची भावना व्यक्त केली.