बारामतीत यापुढे गुटखा विक्री बंद ! नामदेव शिंदे यांना दिले निवेदन
'माझा नेता माझा स्वाभिमान' उपक्रमाअंतर्गत संपुर्ण बारामती शहरामध्ये गुटखा व सुगंधित तंबाखू मिश्रित मावा पुर्णपणे बंद

बारामतीत यापुढे गुटखा विक्री बंद ! नामदेव शिंदे यांना दिले निवेदन
‘माझा नेता माझा स्वाभिमान’ उपक्रमाअंतर्गत संपुर्ण बारामती शहरामध्ये गुटखा व सुगंधित तंबाखू मिश्रित मावा पुर्णपणे बंद
बारामती वार्तापत्र
आपल्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या
स्वच्छ व पारदर्शक कामाचा आदर करत ‘माझा नेता माझा स्वाभिमान’ हा उपक्रम बारामती शहर पान असोसिएशन तर्फे राबविण्यात आला आहे.
त्यामध्ये पान असोसिएशनकडून गुटखा व सुगंधित तंबाखू मिश्रित मावा यांच्या विक्रीचा जाहीर निषेध करीत बारामती शहर पान असोसिएशन ने गुटखा व मावा विक्री चा विरोध केला आहे. बारामती शहर पान असोसिएशन मध्ये जर कोणी गुटखा किंवा मावा विक्री करताना प्रशासनाच्या निदर्शनास आला तर त्याच्या या कृत्यास बारामती शहर पान असोसिएशन जबाबदार राहणार नाही. प्रशासनाने त्या पान दुकानादारावर योग्य ती कारवाई करावी जेणेकरून भविष्यात बारामती शहर परिसरामध्ये कोणीही गुटखा व सुगंधित तंबाखू मिश्रित मावा विक्री करणार नाही. अशा आशयाचे निवेदन असोसिएशनने आज प्रशासनास दिले आहे