उपमुख्यमंत्री अजित पवार विद्यार्थिनीचे ९९.९ टक्के मार्क्स ऐकून मुलीसमोर हात जोडले आणि चांगलाच हशा पिकला!
अनेक दादांच्या किस्से सर्वांनी ऐकले आहेत आणि बघितलेदेखील आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार विद्यार्थिनीचे ९९.९ टक्के मार्क्स ऐकून मुलीसमोर हात जोडले आणि चांगलाच हशा पिकला!
अनेक दादांच्या किस्से सर्वांनी ऐकले आहेत आणि बघितलेदेखील आहे.
पुणे प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहेमीच आपल्या स्वभावाने चर्चेत असतात.कधी सभेत थेट कार्यकर्त्याचे कान टोचणे तर कधी कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या खातीर थेट चहाच्याच टपरीवर चहा पिणे. असे अनेक दादांच्या किस्से सर्वांनी ऐकले आहेत आणि बघितलेदेखील आहे. तर नेहमी दादाची दादागिरी देखील सर्वांनी पाहिली आहे. पण आज अजितदादांनी एका विद्यार्थिनीसमोर हातच जोडले.याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
पुण्यात नुकतेच देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदर्शनाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे तेथील विविध वस्तूंविषयी माहिती घेत होते. ही माहिती देणाऱ्या एका विद्यार्थिनीला अजित पवार यांनी तिचे परीक्षेतील गुण विचारले. विद्यार्थिनीने मला ९९ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले असल्याचं सांगताच अजित पवारांनी थेट हातच जोडले. अजित पवारांच्या या कृतीनंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकाला.
त्यानंतर अजित पवारांनी भाषणावेळी साक्षी खटके आणि सायली देशमुख या दोघींच्या गुणांचा संदर्भ देत सांगितलं की, “इथल्या मुली हुशार आहेत. ९८ टक्के मार्क आहेत. आमचे दोन वर्षाचे मार्क एकत्र केले, तरी ९८ टक्के होणार नाहीत”. अजित पवारांचं हे वक्तव्य ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
पुढे ते म्हणाले की, “मी दुधाचा व्यवसाय केला आहे. गायींची खरेदी- विक्री करायला आम्ही जायचो. गाडीत गाय घेऊन जायचो. वेळ झाला की विहीर बघून गायीला पाणी पाजणं, चारा घालणं हे काम आम्ही केलं आहे. त्यामुळे यातले बारकावे आम्हाला माहित आहेत. शेतकरी गोवंशाबद्दल हळवा असतो आणि कृतज्ञदेखील असतो. वेगवेगळे गोवंश टिकले पाहिजेत. पण काहीजण या सगळ्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत”.