उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सन 2021-22 साठी 520.78 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी
सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सन 2021-22 साठी 520.78 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी
सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे,बाारामती वार्तापत्र
जिल्हा वार्षिक योजनेंतर्ग सन 2021-22 करिता मंजूर करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत 520 कोटी 78 लक्ष रुपये, अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत 128 कोटी 93 लक्ष रुपये व आदिवासी उपयोजना अंतर्गत 44 कोटी 38 लक्ष रुपयाच्या कमाल आर्थिक मर्यादेत प्रारूप आराखड्यांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 2020-21 साठी मंजूर नियतव्यय आणि झालेला खर्च तसेच 2021-22 साठी प्रस्तावित करण्यात येणाऱ्या नियतव्ययासाठी जिल्हा नियेाजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन सभागृहात झाली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो-हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खा. सुप्रिया सुळे, खा. गिरीष बापट, खा.श्रीरंग बारणे , खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह सर्व आमदार तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.