एसटीबाबत मोठ्या निर्णयाच्या तयारीत! संपावर तोडगा निघाला नाही तर खासगीकरणाची चाचपणी; सल्ल्यासाठी पीएमजी संस्थेची नेमणूक
कोरोनामुळे मोठे नुकसान सोसावे लागले. एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी राज्य सरकारची आर्थिक मदत घ्यावी लागत आहे.
एसटीबाबत मोठ्या निर्णयाच्या तयारीत! संपावर तोडगा निघाला नाही तर खासगीकरणाची चाचपणी; सल्ल्यासाठी पीएमजी संस्थेची नेमणूक
कोरोनामुळे मोठे नुकसान सोसावे लागले. एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी राज्य सरकारची आर्थिक मदत घ्यावी लागत आहे.
प्रतिनिधी
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. अशातच आर्थिक संकटात निर्माण होत असल्याने एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. एसटीचे खासगीकरण होऊ शकते का यासंदर्भात महामंडळाने कमिटी नियुक्त करून अभ्यास अहवाल सादर करण्यास केपीएमजी संस्थेला सांगितले आहे.
सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. तर विलिनीकरण शक्य नसल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह सत्ताधारी महाविकास आघाडीतील अनेक नेते म्हणत आहेत. अशावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला नाही तर एसटीच्या खासगीकरणाबाबत विचार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
एसटीचे खासगीकरण होऊ शकतं का? याबाबत महामंडळानं कमिटी नियुक्त करुन अभ्यास अहवाल सादर करण्यास सांगितल्याची माहिती मिळतेय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाने एसटीचे विलिनीकरण करण्यापेक्षा खासगीकरण होऊ शकतं का, याबाबत महामंडळाने एक कमिटी नियुक्त केलीय. एसटीच्या शिवनेरीच्या खासगी बस एसटी महामंडळाच्या सेवेत कार्यरत आहेत. तशाच पद्धतीच्या हजार खासगी गाड्या घेऊन एसटी महामंडळाचा तोटा भरुन निघू शकतो का? याबाबत या कमिटीला आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. उत्तर प्रदेशात हाच खासगीकरणाचे मॉडेल राबवण्यात आले आहे. त्याचाही अभ्यास या कमिटीला करण्यास सांगण्यात आल्याची माहिती मिळतेय.
काय आहे उत्तर प्रदेशाचा फॉर्म्यूला?
उत्तर प्रदेशाच्या एसटी महामंडळात सध्या 11 हजार 393 बसेसचा ताफा असून, यातील दररोज 9 हजार 233 बसेस रस्त्यावर धावतात. यातील 2 हजार 910 बसेस या भाडेतत्त्वावर धावत आहेत. एकूण बसेसपैकी 30 टक्के बसेस उत्तर प्रदेशच्या एसटी महामंडळात खासगी बसेस आहे. या बसेसच्या ताफ्यानुसार उत्तर प्रदेशच्या एसटी महामंडळात फक्त 21 हजार 10 कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रति बसेसवर फक्त ३ कर्मचारी आहेत.