क्राईम रिपोर्ट

कट्टा घेऊन बारामतीत फिरत होता; पोलिसांनी थेट बेड्या ठोकल्या!”

“अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची खैर नाही!

कट्टा घेऊन बारामतीत फिरत होता; पोलिसांनी थेट बेड्या ठोकल्या!”

“अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची खैर नाही!

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी कट्टा बाळगणाऱ्या परप्रांतीय आरोपीला पोलिसांनी जेरबंद करत अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली.

पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयितावर पाळत ठेवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

या कारवाईत बारामती तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रांविरोधातील कारवाई आणखी तीव्र होण्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.

Back to top button