क्राईम रिपोर्ट

हातात कोयता, रस्त्यावर दहशत अन् पोलिसांचा थेट ‘ॲक्शन’! बारामतीत तरुणाला अटक

मंदिरासमोरील रोडवर एक इसम हातात लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण

हातात कोयता, रस्त्यावर दहशत अन् पोलिसांचा थेट ‘ॲक्शन’! बारामतीत तरुणाला अटक

मंदिरासमोरील रोडवर एक इसम हातात लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील मेढड येथे सार्वजनिक ठिकाणी हातात लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या २५ वर्षीय तरुणावर माळेगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी संबंधित इसमाला ताब्यात घेत त्याच्याकडील लोखंडी कोयता जप्त केला.

दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता माळेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार खाजगी वाहनातून पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मेढड गावातील रखुमाई मंदिरासमोरील रोडवर एक इसम हातात लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण करीत आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या वर्णनाप्रमाणे तन्मय बापूराव गुळीक (वय २५, रा. मेढड, ता. बारामती) हा इसम हातात लोखंडी कोयता घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडील लोखंडी कोयता जप्त केला.

याप्रकरणी संबंधित इसमाविरुद्ध शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(अ)(३) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे तसेच पोलीस अंमलदार विजय वाघमोडे, अमर थोरात, ज्ञानेश्वर मोरे, अमोल वाघमारे आणि अमोल राऊत यांनी केली.

👮 माळेगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची माहिती नागरिकांना मिळाल्यास ती तत्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन माळेगाव पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे.

Back to top button